अहमदनगर: वीज बिल वसुलीच्या प्रश्नावर आता ज्येष्ठ समाजसेवक प्रणित ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. शेतकऱ्यांकडून कृषी पंपाची सक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासाठी सोमवारी (२२ फेब्रुवारी) कृषी राज्यमंत्री यांच्या कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहेत. दरम्यान, आपण पोलिस बंदोबस्तात वसुली करणार असल्याचे बोललोच नव्हतो. भाजपने आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून बदनामी सुरू केल्याचे स्पष्टीकरण तनपुरे यांनी दिले आहे.

वाचा:

लॉकडाउनच्या काळातील वीज बिले, त्यांची थकबाकी आणि सुरू असलेली वसुली हे मुद्दे सध्या चर्चेत आहेत. वाढीव बिले भरण्यास विरोध होत असून वसुलीसाठी वीज कंपनीकडून विविध उपाय सुरू आहेत. कृषी पंपाची वीज बिल वसुली करण्यासाठी काही ठिकाणी डीपी बंद केल्याच्याही तक्रारी येत आहेत. घरगुती वीज बिल वसुलीसोबतच कृषी पंपांच्या वीज बिल वसुलीचा प्रश्नही सध्या पेटत आहे.

या पार्श्वभूमीवर हजारे प्रणित भारतीय जनसंसद या संघटनेने आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख अशोक सब्बन यांनी दिली. सोमवारी २२ फेब्रुवारीला उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या राहुरीतील कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहे. स्वत: हजारे यामध्ये सहभागी होणार नसले तरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. सक्तीने होणारी कृषी पंपाची वीज बिल वसुली थांबवावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.

मी तसे बोललोच नाही: तनपुरे

ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्या एका वक्त्यव्यामुळे वातावरण पेटले आहे. मात्र, स्वत: तनपुरे यांनीच आता आपण असे बोललो नसल्याचे स्पष्ट केले आहे. नगर शहरातील तेलीखुंट वीज कार्यालयातील कर्मचाऱ्यावर एका गुंडाने हल्ला केला होता. त्यावेळी तनपुरे तेथे आले होते. वीज बिल वसुलीसाठी गेल्यावरही असे हल्ले होतात, त्यामुळे पोलिस संरक्षण देणार का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी त्यांना केला होता. त्यावर यासंबंधी आपण पोलिस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे तनपुरे म्हणाले होते.

वाचा:

यासंबंधी स्पष्टीकरण देताना तनुपरे यांनी आता सांगितले की, हल्ला झालेल्या कर्मचाऱ्यांना धीर देण्याची आपली भूमिका होती. कृषी पंपाचे वीज बिल वसुलीसाठी पोलिस कारवाई करण्याचा कोणताही विचार नाही. शेतकऱ्यांना त्रास होईल, असे निर्णय घेतले जाणार नाहीत. भाजपने माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियात बदनामी सुरू केल्याचा आरोपही तनपुरे यांनी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

85 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here