मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या`तेलाच्या किमतीत वाढ होत असून त्याचा भार सामान्य ग्राहकांच्या माथी मारण्याची भूमिका पेट्रोलियम कंपन्यांकडून चोखपणे बजावण्यात येत आहे. आज सलग १२ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज देशभरात पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी महागले. आज भोपाळमध्ये डिझेलने ८९.२३ रुपयांची आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९७ रुपये झाले आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८८.०६ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५८ रुपये झाले आहे. ८०.९७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.९८ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.७८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.५६ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.६१ रुपये असून डिझेल ८५.८४ रुपये झाला आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने ६३ डाॅलरची पातळी ओलांडली आहे.

दरम्यान, राजस्थानमधील श्री गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अन्नुपूर या दोन शहरात साध्या पेट्रोलने शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. याआधी शुक्रवारी देशभरात पेट्रोल ३१ पैसे आणि डिझेल ३३ पैशांनी महागले होते तर गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात ३४ पैसे आणि डिझेलमध्ये ३२ पैसे वाढ केली होती.इंधन दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. माल वाहतुकीचे भाडे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षा, टॅक्सी सेवा यांच्या किमान भाडे दरात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १२ दिवस केलेल्या दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडून गेले आहे. या १२ दिवसात पेट्रोल ३.२८ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात पेट्रोल ६.७७ रुपयांनी महागले आहे. मागील १२ दिवसात डिझेल ३.४९ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात झालेल्या दरवाढीने डिझेलच्या किमतीत ७.१० रुपये वाढ झाली.

शहर पेट्रोल डिझेल
मुंबई ९७.०० ८८.०६
दिल्ली ९०.५८ ८०.९७
चेन्नई ९२.५९ ८५.९८
कोलकाता ९१.७८ ८४.५६

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here