पुणे: पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष हे मुस्लिमविरोधी कसे नाहीत, हे सांगताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या चर्चेला उधाण आलं आहे. ‘नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं. मुस्लिम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपवर होत असलेला मुस्लिमविरोधाचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न पाटील यांनी यावेळी केला. ‘देशाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना आमचा विरोध राहणारच, पण सर्व मुस्लिमांना विरोध असण्याचं कारण नाही. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी अनेक बाबतीत मुस्लिमांना प्राधान्य दिलं आहे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं. मुस्लिम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही. एक कर्तृत्ववान, संशोधक म्हणून त्यांना मानाचं स्थान दिलं,’ असं पाटील म्हणाले. ‘मुस्लिम महिलांच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी मोदींनी तीन तलाकचा कायदा केला. बिहारमध्ये मुस्लिम महिलांना रांग लावून भाजपला मतदान केलं. बिहारमधील मुस्लिमबहुल भागांत २९ पैकी १४ जागा भाजपला मिळाल्या त्याचं कारण मोदींनी केलेलं हे काम आहे. मोदी हे मुस्लिम विरोधी आहेत असं चित्र रंगवलं जातं ते खरं नाही. असा दावा पाटील यांनी केला.

वाचा:

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते. ते खरंही आहे. मात्र, शिवरायांनी मुघलांचं साम्राज्य गाडून स्वराज्य निर्मिती केली हेही विसरता
येणार नाही,’ असं पाटील यावेळी म्हणाले.

वस्तुस्थिती काय?

हे २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपती पदावर होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं कलाम यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं होतं. काँग्रेस व समाजवादी पक्षानंही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी हे त्या काळात गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते. कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाशी त्यांचा संबंध नव्हता. असं असतानाही पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here