मुंबई: ‘मला फक्त नवी मुंबईतलेच नाहीत तर इंटरनॅशनल डॉनसुद्धा ओळखतात…’ भाजपचे आमदार यांनी केलेल्या या वक्तव्यावरून सध्या सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांनी नाईक यांच्या या विधानाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर भाजपनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ( Taunts )

वाचा:

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या तेथील प्रचार जोरात आहे. महाविकास आघाडीनं नाईकांचं संस्थान खालसा करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. अनेक नेते प्रचारासाठी नवी मुंबईत येत आहेत. खासदार सुळे यांनी काल कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी गणेश नाईक यांच्यावर तोफ डागली होती. ‘भाजप आमदाराच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. इंटरनॅशनल डॉनशी संबंध असल्याचं या आमदारानं म्हटलं आहे. हे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर आहे. त्याबाबत मी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे. याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे’, असं सुप्रिया म्हणाल्या होत्या.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते, आमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गणेश नाईक यांच्या भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू… अशा ट्रकभर ‘एसआयटी’ कराव्या लागतील,’ असं शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!,’ असा खोचक टोलाही शेलार यांनी हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here