म. टा. प्रतिनिधी,

‘काँग्रेसच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विविध क्षेत्रांचे केले. याचा फटका सामान्यांनी उभारलेल्या अर्थव्यवस्थेला बसला. सामान्यांचा विकास आज पूर्णत: हरविला आहे. यातून सावरण्याचा प्रयत्न विद्यमान केंद्र सरकार करीत आहे,’ असे सांगत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सध्या सुरू असलेल्या सार्वजनिक क्षेत्रांच्या खासगीकरणाचे समर्थन केले.

वाचा:

भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरतर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावरील विश्लेषणात्मक व्याख्यान सिव्हिल लाइन्समधील चिटणवीस सेंटर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. प्रभू बोलत होते. ते म्हणाले, ‘आजपासून अडीचशे वर्षांपूर्वी भारताची ओळख ‘सोने की चिडीया’ अशी होती. तेव्हाची अर्थव्यवस्था ही श्रमिकांमुळे यशस्वी झाली होती. त्यांनी स्वत:च्या क्षमतांना विकासामध्ये परावर्तीत केले होते. त्यामुळेच आपल्याकडील रेशीम, मसाले आणि इतर उत्पादने बाहेर देशांमध्ये पोहचविली. वस्त्रोद्योग क्षेत्र हे कधीकाळी सर्वांत मोठे आर्थिक योगदान देणारे होते. दुर्दैवाने मुंबई, अहमदाबाद, कानपूर येथील कंपन्या बंद पडत गेल्या. अशा डबघाईस येऊ पाहणाऱ्या विविध उद्योगांचे, क्षेत्रांचे राष्ट्रीयीकरण तेव्हाच्या सरकारने केले. ज्याचा फटका पुढील काळात सातत्याने बसत गेला. आजस्थितीला देशाची अर्थव्यवस्था पुढे जात असली तरी त्यात सामान्यांचा विकास कुठेही नाही. ही स्थिती बदलण्यासाठी आवश्यक आहे.’

वाचा:

अध्यक्षीय भाषणात माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांनी पाच ट्रिलियनपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे लक्ष्य शक्य आहे. करोनामुळे त्यात कुठलाही अडथळा येणार नाही, असे नमूद केले. याप्रसंगी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे, भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार नागो गाणार आदी उपस्थित होते.

चुकलेल्या धोरणाचा फटका

कधीकाळी दक्षिण कोरिया आणि भारताचे दरडोई उत्पन्न सारखे होते. आज दक्षिण कोरिया आशियातील एक महासत्ता म्हणून पुढे आली आहे. कुठेतरी आपण स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणाचा फटका आपल्याला बसला, असे प्रभू म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here