‘अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सिनेमापूर्वी काळे झेंडे दाखवणार’
अमिताभ बच्चन यांनी झुंड चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने आंदोलन घोषित केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवतील, असे नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस लोकशाही पद्धतीने आधीपासूनच इंधन दरवाढीचा विरोध करत आले आहे. जिथे जेथे अमिताभ बच्चन किंवा अक्षयकुमारच्या सिनेमाचं शूटींग सुरु असेल, तिथे काळे दाखण्यात येतील. प्रत्येक सिनेमापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते सिनेमा थिएटरच्या बाहेर काळे झेंडे घेऊन विरोध दर्शवणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
अमिताभ बच्चन यांचे ट्विट
बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर झुंडच्या प्रदर्शनाची तारीख ट्विट करत जाहीर केली. झुंड चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करत अमिताभ लिहितात, ‘करोनाने आपल्याला अनेक धक्के दिले, मात्र आता पुनरागमनाची वेळ आली आहे. आपण चित्रपटगृहात परतलो आहोत. ‘झुंड’ १८ जूनला प्रदर्शित होतोय.’
क्लिक करा आणि वाचा-
नाना पटोलेंनी का दिला इशारा?
केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून सरकारवर टीका करत असत. आता मात्र ते गप्प आहेत असे पटोले यांचे म्हणणे आहे. पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली तरी देखील ते गप्प का असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times