या संदर्भात तक्रार आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तपासादरम्यान त्याच्या घरात पश्चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा २४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतीत जावून चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याचा नावाचा कोणताही रहिवाशी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.
नादिया येथील जिल्हाधीकारी कार्यालयामधील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असलेल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी रुबेलच्या घरात सापडलेला शाळा सोडल्याबाबतच्या दाखल्याचे जिल्हा शाळा निरीक्षक ए.स. जि. नादिया, राज्य पश्चिम बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता या दाखल्यामध्ये नमूद करण्यात आलेले बोलगंडा आदर्श हायस्कूल ही शाळाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. याच सर्व खोटया कागदपत्राच्या आधारावरच त्याने आधार कार्ड आणि पॅनकार्ड काढल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तसेच भाजपचा मुंबईचा अल्पसंख्याक सेलचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले आहे. भाजपचा हा संघजिहाद आहे का?,’ असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times