अंमली पदार्थ प्रकरणी पामेला यांना अटक झाल्यापासून भाजपही बॅकफूटवर आला आहे. पामेलाच्या अटकेपासून सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ चे विडंबन आता पामेला गोस्वामीविरोधात सोशल मीडियावरील युजर्सनी केला आहे. ट्विटरवर हॅशटॅग #कोकीनजीवी हे ट्रेंडमध्ये आहे.
गोस्वामी बऱ्याच कालावधीपासून तस्करीतः पोलिस
पामेला गोस्वामी या बऱ्याच कालावधीपासून अंमली पदार्थ्यांच्या तस्करीत सामील आहेत. त्या आपले सहकारी प्रबीर सोबत खरेदीदारास अंमली पदार्थ पुरवण्यासाठी आल्या होत्या. त्यांची चौकशी केली जात आहे. मिळलेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई केली गेली, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
कोण आहे पामेला गोस्वामी?
पामेला गोस्वामी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आहेत. पामेला या खूप सक्रिय आहेत आणि सोशल मीडियावर पक्षाशी संबंधित अपडेट पोस्ट करत असतात. पामेला गोस्वामी या २०१९ मध्ये भाजपा युवा मोर्चात दाखल झाल्या. मॉडेलिंगपासून सुरवात केली. यानंतर त्यांनी एयरहोस्टेस म्हणूनही काम केलं. नंतर बंगाली टेलिव्हिजनच्या जगात प्रवेश केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times