वाचा:
बीडच्या येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने पुणे येथे आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काही ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. त्या आधारावर विरोधी पक्ष भाजपकडून थेट वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिप म्हणजे सर्वात मोठा पुरावा असून राठोड यांच्यावर कारवाई करावी व त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. याप्रकरणी चौकशी झाल्यानंतर योग्यती कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. दुसरीकडे सर्व आरोपांवर मौन बाळगत संजय राठोड हे गेल्या १२ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. या पार्श्वभूमीवर राठोड यांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील धर्मपीठातून आज महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
वाचा:
पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या धर्मपीठात आज महंतांची महत्त्वाची बैठक पार पडली. यात राठोड यांनी पोहरादेवीत संतांचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा सक्रिय व्हावे, अशी विनंतीच महंतांकडून करण्यात आली. विशेष म्हणजे धर्मपीठाने राठोड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला व तिथून राठोड यांच्या भेटीची तारीखही देण्यात आली आहे. त्यानुसार संजय राठोड हे मंगळवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता कुटुंबासह पोहरादेवी येथे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत धर्मपीठाचे महंत जितेंद्र महाराज व सुनील महाराज यांनी माध्यमांना माहिती दिली. संजय राठोड कुटुंबासह येथे येणार आहेत. येथे विधीवत पूजा होईल. त्यानंतर ते संतांचे दर्शन घेतील व या ठिकाणाहून निघतील, असे जितेंद्र महाराज यांनी नमूद केले. राठोड यावेळी माध्यमांशी संवाद साधणार का, याचे उत्तर मात्र मिळालेले नसून राठोड यांच्या पोहरादेवी भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times