राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या हळदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी थोरात शनिवारी नाशिकमध्ये आले होते.त्यावेळी विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलतांना थोरात यांनी महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्रीपदाच्या वादावर पडदा टाकला आहे. राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होईल या विषयात तथ्य नाही. सदरचा विषय कुठून जन्माला आला हे देखील माहीत नसल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगीतले. तसेच मात्र काँग्रेसचाच होणार असून येत्या अधिवेशनात ही निवड निश्चित होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
देशात इंधन दरवाडीचा भडका उडाला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इंधन दरवाढ झाल्याचा आरोप थोरातांनी केला आहे.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकार दिलासा देणार आहे. परंतु, केंद्रसरकार, राज्याचे पैसे देत नसल्यानं मोठी आर्थिक अडचण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु,आर्थिक अडचण असली तरी,तरी अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times