मुंबई: दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळविण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. बंगळुरू येथील न्यायालयाने कोठडी मंजूर केल्यामुळे गुन्हे शाखेचे पथक पोलिसांकडून ताबा घेऊन त्याला सोमवारी मुंबईत आणणार आहेत. याच्यावर मुंबईत सुमारे ४९ गुन्हे दाखल असून अनेक बड्या आणि प्रसिद्ध व्यक्तींना त्याने खंडणीसाठी धमकावले आहे. त्याचा ताबा मिळाल्याने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ( )

वाचा:

मुंबई प्रमाणे देशभरात रवी पुजारी याच्यावर गुन्हे दाखल आहेत. परदेशात बसून रवी पुजारी आपल्या हस्तकांमार्फत भारतामध्ये टोळी चालवत होता. रवी पुजारी हा दक्षिण आफिका येथील सेनेगल पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. दोन वर्षांपूर्वी त्याला भारतामध्ये आणण्यात आले. सुमारे ९० पेक्षा अधिक गुन्हे कर्नाटकमध्ये दाखल असल्याने भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा प्रथम कर्नाटक पोलिसांना देण्यात आला.

वाचा:

रवी पुजारी याच्याविरोधात मुंबईत सुमारे ४९ गुन्हे दाखल असून त्यापैकी २६ गुन्ह्यांमध्ये ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. २०१६ मध्ये विलेपार्लेच्या गजाली हॉटेलबाहेर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने ७ जणांना अटक करून आरोपपत्र दाखल केले. या तसेच इतर गुन्ह्यांमध्ये पुजारील अटक करण्याकरिता गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कदम आणि अजय सावंत यांनी मुंबई पोलिसांच्या वतीने प्रत्यार्पण प्रस्ताव सादर करून सर्व त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. आता न्यायालयाची परवानगी मिळाल्याने सोमवारीच पुजारीला मुंबईत आणले जाणार हे स्पष्ट झाले आहे.

वाचा:

कोण आहे रवी पुजारी?

रवी पुजारी हा मूळचा कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील मालपे येथील असून १९९० मध्ये त्याने गँगस्टर छोटा राजन टोळीसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्वत:ची गुन्हेगारी टोळी बनवली. पुजारी याने मुंबई, बंगळुरू आणि मँगलोर येथे वेगवेगळया क्षेत्रातील व्यावसायिक, बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी धमकावण्यास व हस्तकांमार्फत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यास सुरुवात करून आपल्या टोळीची दहशत निर्माण केली. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अली मोरानी यांच्या हत्येचा कट रचल्याचाही पुजारीवर आरोप आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here