अहमदाबाद, : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ आज बीसीसीआयने जाहीर केला आहे. भारताच्या या संघात धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सामने एकहाती गाजवणाऱ्या खेळाडूंना यावेळी संघात स्थान देण्यात आले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका १२ मार्चपासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या संघात सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आले आहे.भारताच्या या संघात दोन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. आजच्याच दिवशी इशान किशनने धडाकेबाज १७३ धावांची खेळी साकारली होती. या खेळीच्या जोरावर इशानला आता भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर या संघात रिषभ पंत हा यष्टीरक्षक आहे.

भारताच्या सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्याबरोबर असेल. त्याचबरोबर लोकेश राहुल हादेखील एक सलामीचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत आणि इशान किशन यांच्यावर असेल.

या संघात भारतीय संघाची वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ही टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर असेल. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन आणि राहुल तेवातिया यांना देण्यात आली आहे.

भारताचा तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्याचबरोबर चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरु होणार आहे. हे दोन्ही सामने अहमदाबाद येथे होणार आहे. मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज असलेला इशान किशन सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. इशान हा झारखंडच्या संघाचा कर्णधारही आहे. इशानने आज मध्य प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात फक्त ९४ चेंडूंत १९ चौकार आणि ११ षटकारांच्या जोरावर १७३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. त्यामुळे झारखंडच्या संघाला ५० षटकांत तब्बल ४२२ धावांचा डोंगर उभारता आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here