मुंबई: महानायक यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी दिल्यानंतर बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ( )

वाचा:

सरकारच्या काळात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत बोलणारे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार सध्या गप्प असल्याने पटोले यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या दोन्ही अभिनेत्यांच्या चित्रपटांचे शूटींग होऊ देणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला होता. त्यातच ‘’ हा सिनेमा १८ जून रोजी प्रदर्शित होत असल्याचे ट्वीट अमिताभ यांनी करताच पटोले यांनी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांच्या जलसा बंगल्याची सुरक्षा वाढवली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते बंगल्याच्या परिसरात जमा होऊ नयेत याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.

वाचा:

पटोले यांचा नेमका आरोप काय आहे?

केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना पेट्रोल दरवाढीविरोधात अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्वीट करून सरकारवर टीका केली होती. मात्र आता युपीए सरकारवेळी असलेल्या दरांपेक्षा मोठी दरवाढ झाली असतानाही हे सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले आहेत, असा पटोले यांचा आरोप आहे. अमिताभ, अक्षयकुमारसह काही सेलिब्रिटी भाजपाच्या इशाऱ्यावर टिव टिव करतात. त्यामुळेच त्यांचे चित्रपटांचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला होता. त्यातच आज अमिताभ यांच्या आगामी झुंड या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच पटोले आक्रमक झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पावले टाकावी लागली आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here