मुंबई: राज्यात संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना कालच्या तुलनेत आज नवीन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली नाही. शुक्रवारी राज्यात ६ हजार ११२ इतक्या नवीन बाधितांची नोंद झाली होती. त्यात आज किंचित वाढ झाली असून गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २८१ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

वाचा:

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यात विदर्भातील काही जिल्ह्यांत मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत असून , आणि मुंबईतही रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. या सर्वच जिल्ह्यांत स्थानिक प्रशासनाने करोना संबंधीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची पावले उचलली आहेत. नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढ थोडी कमी दिसत असल्याने तो मोठा दिलासा ठरला आहे. राज्यात गुरुवारी पाच हजारावर नवीन बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी हा आकडा सहा हजारपार जाऊन ६ हजार ११२ इतका झाला होता. त्यात आज किंचित वाढ झाली.

वाचा:

राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत करोनाने एकूण ५१ हजार ७५३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.४७ टक्के इतका आहे. आज राज्यात ६ हजार २८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ५६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ९२ हजार ५३० करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१६% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५६ लाख ५२ हजार ७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ९३ हजार ९१३ (१३.३८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २८ हजार ६० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १ हजार ६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

शहरात आज वाढले ८०६ रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. काही दिवसांपूर्वी ३० हजारपर्यंत खाली आलेली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ४८ हजार ४३९ इतकी झाली आहे. त्यात सर्वाधिक ९ हजार २१७ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहेत तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ३८८ इतकी झाली आहे. आणि ठाण्यापेक्षाही नागपुरात अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या ५ हजार ५५६ तर मुंबईत ५ हजार ४६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. चिंतेची बाब म्हणजे ज्या अमरावती जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तिथे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५ हजार १०२ इतका झाला आहे. दैनंदिन रुग्णवाढ पाहिल्यास आज सर्वाधिक १७२६ रुग्णांची वाढ अकोला मंडळात झाली आहे. यात तब्बल ८०६ रुग्ण एकट्या अमरावती पालिका हद्दीत वाढले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here