पुणे: पुण्यात १५ दिवस लावण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे पुणेकरांची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र, ही निव्वळ अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याबाबत संभ्रम वाढू नये म्हणून खुद्द जिल्हाधिकारी डॉ. यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागले. दरम्यान, अशाप्रकारच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ( District Collector )

वाचा:

‘पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन’, असा मथळा असलेला एका मराठी वृत्तवाहिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता. त्याची वेळीच गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले. हा जुन्या बातमीचा व्हिडिओ कुणीतरी व्हायरल केला आहे. मात्र, सध्यातरी जिल्ह्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव व मोबाइल क्रमांक तसेच ग्रुपचे नाव (स्क्रीन शॉटसह) पाठवल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे. कृपया कोणीही अशाप्रकारे अफवा पसरवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

वाचा:

दरम्यान, राज्यात सध्या पुणे जिल्ह्यामध्ये करोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शनिवारच्या नोंदीनुसार हा आकडा ९ हजार २१७ इतका आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात एक हजारावर नवे करोना बाधित आढळून आले होते तर शनिवारी जिल्ह्यात ८४७ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे चिंता वाढत चालली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने लागू केलेल्या करोना बाबतच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश आधीच जिल्हाधिकारी देशमुख यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका; तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला दिले आहेत. जिल्ह्यात वा लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला गेला नसला तरी सध्या लागू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात जमावबंदी असल्याने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here