कंपनीने या फोनची किंमत केवळ ४ हजार ८२९ रुपये ठेवली आहे. हा फोन केवळ ऑफलाइन स्टोरमधून खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जिओकडून १२०० रुपयांचा रिचार्ज व्हाऊचर्स सह अतिरिक्त ५० जीबी डेटा देणार आहे. ग्राहकांना हा डेटा केवळ १९९ रुपये आणि २९९ रुपयांच्या प्लानवर मिळणार आहे. या फोनमध्ये ६.१ इंचाचा ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. परंतु, या फोनमध्ये किती रॅम आणि प्रोसेसर असणार आहे, याबाबत माहिती जाहीर करण्यात आली नाही. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बजेट स्मार्टफोनमुळे या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला नाही.
या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ४.०, वाय फाय, जीपीएस, ४जी व्होल्ट, यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. ४,१२० एमएचएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. लावाने याआधी लावा झेड७१ हा फोन बाजारात उतरवला होता. या फोनची किंमत ६ हजार २९९ रुपये इतकी होती. या फोनमध्ये ५.७ इंचाचा डिस्प्ले, १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर तसेच सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times