कॉलराडो: अमेरिकेतील डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर आज मृत्यू दिसणार असल्याची कोणत्याही प्रवाशाने कल्पना केली नसेल. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेत विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने आग लागली. मात्र, पायलटच्या प्रसंगावधनामुळे २४१ प्रवाशांचे प्राण बचावले गेले.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, होनोलुलू येथे जाणाऱ्या बोईंग ७७७ विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर एका इंजिनात बिघाड झाला. त्यानंतर हे विमान पुन्हा विमानतळावर दाखल झाले. इंजिनात बिघाड झाल्यामुळे आग लागली. आग लागल्यामुळे काही भाग कोसळून पडत होते. मात्र, पायलटने काही वेळेतच विमान सुखरुपपणे उतरवले. विमानाचा क्रू आणि प्रवाशी सर्व सुखरूप आहेत. आग लागल्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने रेकोर्ड केला.

या विमानात १० क्रू कर्मचाऱ्यांसह २३१ प्रवाशी होते. एका प्रवाशाने सीएनएनला सांगितले की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेतच एक जोरदार आवाज ऐकू आला. खिडकी बाहेर पाहिल्यानंतर इंजिन दिसत नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी विमान एक हजार फूट उंचीवर होते. सुरक्षित लँडिंगनंतर सर्वांना नव्या विमानाने पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले. युनायटेड एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, FAA, NTSB आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला असून या घटनेमुळे काही नुकसान झाले आहे का, याची माहिती घेतली जात आहे.

वाचा:

पायलटकडून ‘मेडे’चा कॉल

इंजिन फेल झाल्याची माहिती पायलटने नियंत्रण कक्षाला दिली. त्याशिवाय मेडेचा (MayDay) कॉल दिला. त्याच वेळेस विमानाचे काही अवशेष आग लागल्यामुळे जमिनीवर कोसळत होते. हे अवशेष निवासी भागातही पडले. ब्रुमफिल्ड पोलिसांनी याबाबतचे छायाचित्र जारी केले आहेत. विमानाचे अवशेष कोसळल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विमान कोसळण्याची दाट शक्यता असते, अथवा मोठा अपघात होणार असतो तेव्हा पायलटकडून ‘मेडे’चा कॉल दिला जातो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here