मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शौचासाठी शेताच्या दिशेने गेली होती. तिथे गावातील तिघे जण होते. तिघांनी दुचाकीवरून तिचे अपहरण केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर रात्री उशिरा तिला शेतात आणून फेकले. घाटमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. पीडितेचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. मात्र, ती कुठेच सापडली नाही. तिचा शोध घेतानाच ते शेतावर पोहोचले. त्यावेळी मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, गावातीलच तिघा तरुणांनी मुलीवर बलात्कार केला. तिचे दुचाकीवरून अपहरण केले होते. मुलीने दोन आरोपींची नावे सांगितली आहेत. तिसऱ्या तरुणाला ती ओळखत नाही. या घटनेची माहिती पोलिसांत दिली असून, माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी विनंती केली आहे.
एका १७ वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या घटनेची माहिती मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोघांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times