करिना आणि सैफ यांनी घरात पुन्हा एकदा गोड बातमी असल्याचं काही महिन्यांपूर्वी चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात करिना बाळाला जन्म देणार असल्याची माहितीही त्यानं दिली होती. ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर करिनाच्या गरोदरपणाचीही प्रचंड चर्चा झाली. नवव्या महिन्यापर्यंत करिनानं तिचं काम सुरूच ठेवलं होतं.
करिना मुलीला जन्म देणार की मुलाला? याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता होती तर दोन दिवसांपूर्वी सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सबाने सैफचा एक जुना फोटो शेअर केला होता. यात त्याच्यासोबत लहान इब्राहिमही दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना सबाने लिहिलं होतं की, ‘हा एक छोटासा इशारा आहे, माझे चॅम्प.’
हा फोटो पाहून युझर्सने तिला सोशल मीडियावर प्रश्न विचारायला सुरुवात केली होती की, पुन्हा मुलगाच झाला का हा प्रश्न अनेकांनी विचारला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times