कोलकाता: पश्चिम बंगाल भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीस ( ) यांना शुक्रवारी कोलकाता पोलिसांनी अटक ( ) केली. या प्रकरणात त्यांनी भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे पक्षाचे प्रभारी यांच्या सहकाऱ्याचे नाव घेतले आहे. शनिवारी संध्याकाळी पोलिस स्थानिक कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा कारमधून खाली उतरल्यानंतर पामेला गोस्वामी या पत्रकारांवर ओरडल्या.

या अंमली पदार्थ प्रकरणात भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे सहकारी राकेश सिंह यांचाही समावेश आहे, असं त्यांनी सांगितलंय. तर राकेश सिंह यांनी आपल्याविरूद्ध कट रचल्याचा आरोप पामेला यांनी केला. यासह पामेला यांनी याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणीही केली.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आणि कैलास विजयवर्गीय हे पक्षाचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी देखील आहेत.

या प्रकरणी सीआयडी चौकशी करावी. कैलास विजयवर्गीय यांचे सहकारी असलेले भाजपचे राकेश सिंह यांना अटक करावी. हा त्यांचाच कट होता, असं पामेला म्हणाल्या. पण पामेला यांनी कोर्टात या आरोपाचा पुनरुच्चार केला नाही.

कोलकात्यात शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी कारवाई करत पामेला गोस्वामी यांची आणि त्यांच्या कारची तपासणी केली. यात तपासात त्यांच्याकडून १०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गोस्वामी यांच्यासह युवा मोर्चातील त्याचा मित्र आणि सहकारी आणि कारमध्ये असलेले प्रबीर डे यांनाही अटक करण्यात आली आहे.

गोस्वामी यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एका टीव्ही मालिकेत काम केलं होतं. त्यापूर्वी त्या एअर होस्टेस होत्या आणि मॉडेलिंग करत होत्या. यानंतर त्यांची भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि हुगळी जिल्ह्यासाठी युवा मोर्चा पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here