दरम्यान, बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सीएपीएफच्या १२ कंपन्या शनिवारी पोहोचल्या. दोन कंपन्या रेल्वेने दुर्गापूरला पोहोचल्या, त्यापैकी एक कंपनी बीरभूम आणि एक कंपनी बनकुडा जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे. त्याचवेळी एक कंपनी बर्धमानमध्ये पोहोचली आहे.
बंगालमधील सुरक्षेवर विशेष भर
यावर्षी ५ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी राज्यांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ) तैनात करण्यास सुरवात झाली आहे. केंद्रीय सुरक्षा दलांची राज्यांमध्ये दाखल होण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. पश्चिम बंगालमधील सुरक्षेबाबत निवडणूक आयोग ( ) चिंतेत आणि सतर्क आहे. सीएपीएफच्या १२५ कंपन्यांना बंगालमध्ये पाठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
पाच राज्यांसाठी सीएपीएफ कंपन्या शनिवारी रवाना झाल्या. ४५ कंपन्या तामिळनाडूमध्ये, ४० आसाम (आसाम), १० पुदुच्चेरी आणि ३० केरळमध्ये पाठवल्या जात आहेत. अद्याप या पाच राज्यांपैकी कोणत्याही राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक आयोगाने या राज्यांत निवडणूक अधिकारी तैनात करण्याबाबत आधीच सूचना जारी केल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times