भारतीय संघात निवड होण्यासाठी सूर्यकुमार यादवला बरीच मोठी प्रतिक्षा करावी लागली. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची निवड झाली नाही म्हणून बराच गदारोळ झाला होता. सूर्यने प्रथम श्रेणीच्या ७७ सामन्यात ४४.०१च्या सरासरीने ५ हजार ३२६ धावा केल्या आहेत. यात १४ शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर १७० टी-२० सामन्यात १४०.१०च्या स्ट्राइक रेटने ३ हजार ५६७ धावा केल्या आहेत.
सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याने डीवाय पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर बसलेला एक फोटो इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला त्याने The feeling is surreal अशी कॅप्शन दिली आहे.
देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून खेळणारा सूर्यकुमार आयपीएलमध्ये संघाकडून खेळतो. सूर्यकुमार जोरदार फटकेबाजी करतो. गेल्या हंगामात मुंबईला विजेतेपद मिळून देण्यात सूर्यकुमारची महत्त्वाची भूमिका होती. आयपीएलच्या १३व्या हंगामापासून तो मुंबईकडून खेळतोय. १६ सामन्यात त्याने ४०च्या सरासरीने ४८० धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट १४५.०२ इतका होता.
सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाल्यानंतर भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला होता. इरफान पठाणने देखील शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका १२ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानंतर १४, १६, १८ आणि २० मार्च होती लढती होणार आहेत. हे सर्व सामने मोटेरा मैदानावर होतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times