नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी नुकताच लिलाव झाला. या लिलावानंतर भारताच्या एका युवा खेळाडूने धमाकेदार शतकी खेळी केली. देशात सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२१चे सामने सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राचा सलामीवीर ( )ने शानदार शतक झळकावले. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. याआधीच्या हंगामात अखेरच्या काही सामन्यात संधी मिळालेल्या ऋतुराजने धमाकेदार खेळी केली होती.

विजय हजार स्पर्धेत ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने ५० षटकात ८ विकेटच्या बदल्यात २९५ धावा केल्या. त्याने १०९ चेंडूत १०२ धावा केल्या यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. ऋतुराजचा जोडीदार सलामीवीर यश नाहरने त्याला सुरेख साथ दिली. यशने ६३ चेंडूत ५२ धावा केल्या. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तर नौशाद शेख २८ धावा केल्या. केदार जाधवला २५ चेंडूत फक्त १४ धावा करता आल्या.

वाचा-

या शिवाय महाराष्ट्राकडून अंकित बवानेने ३५, निखिल नायकने ६ धावा केल्या. संघाला आणखी धावा करता आल्या असत्या पण हिमचाल प्रदेशच्या वैभव अरोडानेन अखेरच्या काही षटकात हॅटट्रिक घेत महाराष्ट्राला २९५ वर रोखले. वैभवने ७ षटकत ४५ धावा देत ४ विकेट घेतल्या.

गेल्यावर्षी करोनामुळे युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने अखेरच्या तीन सामन्यात तीन अर्धशतक झळकावले होते. त्याच्या या धमाकेदार कामगिरीमुळे तो चर्चेत आला होता.

शैलीदार फलंदाज असलेल्या ऋतुराजने १९ व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१६-१७ मध्ये त्याची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली. इंडिया ए कडून त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. २०१९ साली इंग्लंड लायन्स विरुद्ध तो खेळला होता. त्याची सुरुवात चांगली झाली नव्हती. तो गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर ऋतुराजने करिअर योग्य दिशेने पुढे नेले.

भारत ए कडून खेळताना त्यांने श्रीलंका ए आणि वेस्ट इंडिज ए विरुद्ध ११२.८३च्या सरासरीने ६७७ धावा केल्या. त्याचा स्ट्रइक रेट ११६.७२ होता. ऋतुराजची धावसंख्या नाबाद ८७, नाबाद १२५ ९४, ८४,७४,३,८५, २० आणि ९९ अशी होती. ऑक्टोबर २०१८ साली देवधर ट्रॉफीत भारत ब संघात त्याची निवड झाली होती. डिसेंबर २०१८ झाली ते एमसीसीच्या एमर्जिंग टीममध्ये होता.

डिसेंबर २०१८ साली चेन्नई सुपर किंग्जने २० लाखच्या बेस प्राइसवर ऋतुराजला विकत घेतले होते. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात मिळालेल्या संधीचा त्याने भरपूर फायदा घेतला. आयपीएल सुरू होण्याआधी त्याला करोनाची लागण झाली होती. पण करोनावर मात करून फिट होऊन तो परत आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here