मुंबईः महाराष्ट्र अनलॉक होत असातानाच राज्यातील काही जिल्ह्यांत पुन्हा करोनानं डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनानंही कंबर कसली आहे. तर, पुण्यात संचारबंदी लागू केल्यानंतर विदर्भातील तीन जिल्ह्यात नाइट कर्फ्यू लावण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिले आहेत.

विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावतीत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. अमरावतीतही मुंबईपेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळं अमरावतीत आज एक दिवसाचा लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. तर, अकोला, यवतमाळमध्येही कठोर निर्बंध करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

वाचाः

‘करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत महाराष्ट्र सरकार नाइट कर्फ्यू लावण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करणार असून निर्णय घेतला जाईल,’ असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, करोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासनानं कठोर पावलं उचलत मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात रात्री ११ ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच, शाळा आणि महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे. तसंच, खासगी कोचिंग क्लासला दिलेली परवानगी रद्द केली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here