वाचा-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दांडगा अनुभव नसला तरी जेमिन्सनला यावेळी लिलावात १५ कोटी रुपये मिळाले. आरसीबीच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलपेक्षा जास्त पैसे मोजत जेमिन्सनला आपल्या संघात स्थान दिले आहे. आता एप्रिल महिन्यात होणाऱ्या आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो यावर सर्वांची नजर असलेच. पण त्याआधी उद्यापासून होणाऱ्या मालिकेत तो कशी कामगिरी करतो याकडे असेल.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या दोन्ही संघांच्या सरावाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वाचा-
कायले जेमिन्सनने आतापर्यंत फक्त ४ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने फक्त ३ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या आधी होणाऱ्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांची नजर असेल. उद्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो कशी गोलंदाजी करतो याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांसोबत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला देखील असेल.
या मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व केन विलियमसन तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अरॉन फिंच करणार आहे. न्यूझीलंडने काही दिवसांपूर्वी टी-२० साठी नवी जर्सी लॉन्च केली आहे. या नव्या जर्सीत न्यूझीलंडचे खेळाडू मैदानावर दिसतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times