मुंबई: बिग बॉसचा १४ वा सीझन आज संपणार आहे. या सीझनचा ग्रँड फिनाले एपिसोड आज होणार आहे. विजेता घोषित होण्यासाठी आता अवघे काही तास आता उरले आहेत. अशात विजेता पदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे स्पर्धक आणि यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात हे दोघंही फिनालेच्या काही तास अगोदरच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचं दिसत आहे.

बिग बॉसच्या फिनालेला आता काही तास उरले आहेत. या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि या शर्यतीत रुबीना दिलैक, राहुल वैद्य, अली गोनी, निक्की तांबोळी आणि राखी सावंत हे स्पर्धक आहेत. या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार हे आता काही तासांमध्ये समजलेच पण त्याआधी शो मेकर्सनी फिनालेमध्ये होणाऱ्या डान्स परफॉर्मन्सची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

फिनालेचा नवा प्रोमो नुकताच कलर्स टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात राहुल वैद्य आणि अली गोनी यांच्या परफॉर्मन्सची झलक सुद्धा पाहायला मिळाली. पण यातील खास गोष्ट अशी आहे की, त्यांचा हा परफॉर्मन्स बिग बॉसच्या घराच्या बाहेर शूट करण्यात आला आहे. स्पर्धकांनी बिग बॉस हाऊसच्या बाहेर परफॉर्मन्स देण्याची ही बिग बॉसच्या इतिहासातील पहिली घटना आहे. या शोमध्ये या दोघांची मैत्री खूप चर्चेत राहिली आणि आताही त्यांनी या मैत्रीवरच त्यांचा डान्स परफॉर्मन्स दिला आहे. या दोघांनी जय-वीरूच्या ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे…’ या गाण्यावर परफॉर्म केलं आहे.

बिग बॉस १४ च्या ग्रँड फिनालेला आता उरले फक्त काही तास
रुबीना-राहुल मानले जात आहे विजेते पदाचे प्रबळ दावेदार
ग्रँड फिनाले आधीच राहुल-अलीचा बिग बॉस हाऊस बाहेरील व्हिडीओ व्हायरल

दरम्यान फिनालेसाठी रुबीना दिलैक, निक्की तंबोळी, अली गोनी, राहुल वैद्य, राखी सावंत या पाच स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धक एकमेकांवर वरचढ ठरल्यानं विजेता कोण होणार हे सांगणं किंवा त्याचा अंदाज लावणं सुद्धा कठीण आहे. पण वोटिंगमध्ये रुबीना दिलैक सर्वात पुढे असल्याचं म्हटलं आहे. तर राहुल वैद्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या दोघांमध्ये विजेतेपदासाठी अटीतटीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here