मुंबई: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा हेल्मेट न घालता बाइक चालवतानाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर मुंबई पोलिसांनी विवेक ओबेरॉयवर कारवाई करत त्याच्याकडून ५०० रुपये दंड वसूल केला. विवेकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हॅलेंटाइन डेला एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तो हेल्मेट न घालता बाइक चालवताना दिसला होता. ज्यावरुन मुंबई पोलिसांनी विवेकवर कायदेशीर कारवाई केली. यावर आता विवेकनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक ओबेरॉनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो आपल्या बाइकवर पत्नी प्रियांका अल्वा ओबेरॉयसोबत दिसला. मात्र बाइक चालवताना विवेकनं हेल्मेट घातलं नव्हतं. तसेच सध्या करोनमुळे मास्कची सक्ती असतानाही सार्वजनिक ठिकाणी विवेक विना मास्क बाइक चालवताना दिसला.

विवेक ओबेरॉवर नुकतीच मुंबई पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर त्यानंही याबाबत मुंबई पोलिसांचे आभार मानत एक ट्वीट केलं आहे. त्यानं फिल्मी अंदाजात ट्वीटमध्ये लिहिलं, ‘प्यार हमें किस मोड़ पे ले आया! निकले थे नई वाइक पर हम और हमारी जान, बिना हेलमेट के कट गया चालान! जर तुम्ही हेल्मेट न घालता बाइक चालवली तर कारवाई करणारच. सुरक्षा ही आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहे याची जाणीव मला करून दिल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार. सुरक्षित राहा, हेल्मेट आणि मास्क नेहमी वापरा.’

विवेक ओबेरॉयचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान विवेकवर कारवाई करण्याऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकनं बाइक चालवताना मास्क सुद्धा लावला नव्हता. जो सध्या करोना व्हायरच्या काळात अनिवार्य आहे. मुंबई पोलिसांनी विवेकवर आयपीसीच्या कलम १८८,२६९ आणि मोटर व्हेइकल अॅक्टच्या कलम १२९,१७७ आणि एपेडमिक कायद्याखाली ही कारवाई केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here