कोलकाताः अवैध कोळसा खनन आणि तस्करी प्रकरणी ( ) सीबीआयने ( ) रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( ) यांचे खासदार भाचे ( ) यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. सीबीआयचे अधिकारी रविवारी दुपारी कालिघाट परिसरातील अभिषेक बॅनर्जी यांच्या शांतिनिकेतन येथे दाखल झाले.

सीबीआयची नोटीस अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांच्या नावाने असल्याचं वृत्त आहे. यावेळी अभिषेक आणि त्यांची पत्नी त्यांच्या निवासस्थानी नसल्याची माहिती मिळाली आहे. सीआरपीसीच्या कलम १६० नुसार साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी अभिषेक यांच्या पत्नीला नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

कोळसा प्रकरणातील आर्थिक व्यवहारात सीबीआयला काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचं सांगण्यात येतंय. त्यात रुजीरा यांचं नावही समोर आलं आहे. त्याच माहितीसाठी सीबीआयला रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी करायची आहे. त्यांना कार्यालयात हजर व्हायचं नाहीए. त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी बोलून सीबीआयला त्यांचा जबाब नोंदवायचा आहे.

कोळसा आणि गायींच्या तस्करी प्रकरणी तृणमूल नेते विनय मिश्रा यांचा शोध घेण्यात येत आहे. विनय मिश्रा हे अभिषेक बॅनर्जींचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं. विनय मिश्रा हे यावेळी फरार आहे. त्याचवेळी प्रकरणातील मुख्य आरोपी अनुप माझी उर्फ लाल हा देखील फरार आहे.

सीबीआयच्या नोटीसनंतर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते कुणाल घोष यांनी केंद्रावर आरोप केला आहे. हा एक राजकीय कट आहे आणि इतर प्रकरणांमध्ये भाजप नेते शोभन देव, सुवेंदू अधिकारी, मुकुल रॉय आणि इतरांना सीबीआय पकडत नाही. पणअभिषेक यांच्या घरी जाऊ नोटीस दिली जाते, असं कुणाल घोष म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here