चाइबासा: झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातील जगन्नाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २२ वर्षीय तरुणीची झाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पार्वती लागुरी असे या तरुणीचे नाव आहे. तिने आपल्या प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यामुळे चिडलेल्या प्रियकरानेच तिचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता.

गोमा बोबोंगा असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पार्वती आणि आरोपी गोमा यांच्यात पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुणा मुलीसोबत त्याला गप्पा मारताना पाहिले की, ती विरोध करायची. त्यानंतर त्याला शिवीगाळ करायची. आपल्या प्रियकराने परक्या तरुणीसोबत बोललेले तिला आवडत नव्हते. त्याचवेळी तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. लग्न केले नाही तर आत्महत्या करण्याची ती धमकी देत होती.

प्रेयसीकडून सातत्याने धमकी आणि लग्नासाठी ती तगादा लावत असल्याने त्याने हत्येचा कट रचला. गोमा याने तिला तोडांगहातू रेल्वे क्रॉसिंगजवळ बोलावले. तिथे ती पोहोचली. त्यानंतर दुचाकीवरून तिला बुढाकमान जाणाऱ्या रस्त्याने जंगलाकडे नेले. तिथे ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने कशीबशी सुटका करून पळ काढला. त्याचवेळी ती एका खड्ड्यात पडली. त्याच खड्ड्यात त्याने तिला मारहाण केली आणि हाताने गळा आवळून हत्या केली.

पोलिसांना पार्वतीच्या मृतदेहाजवळ आधारकार्ड आणि पासबुक सापडले होते. यावरून तिची ओळख पटवली. पार्वतीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. लग्न नाही केले तर आत्महत्या करीन अशी धमकी देत होती. त्यामुळे त्याने हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here