मेलबर्न: करोना व्हायरसच्या वातावरणात झालेल्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पद ()ने मिळवले. त्याने रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवचा अंतिम सामन्यात पराभव केला. जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे विक्रमी नववे विजेतेपद ठरले.

वाचा-

वाचा-

रविवारी झालेल्या अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोविचने मेदवेदेवचा ७-५, ६-२,६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

वाचा-

वर्षातील पहिल्या ग्रॅड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवत ऑस्ट्रेलियन जोकोविचने करिअरमधील १८व्या ग्रॅड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. त्याच बरोबर रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमी २० ग्रॅड स्लॅम विजेतेपदाच्या जवळ तो पोहोचला आहे. वयाची ३० ओलांडल्यानंतर जोकोविचने मिळवलेले हे सहावे ग्रॅड स्लॅम विजेतेपद आहे. याबाबत त्याने नदालच्या विक्रमशी बरोबरी केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here