मुंबई: राज्यात पुन्हा करोनाने (Coronavirus) डोके वर काढले असून राज्य सरकारने करोनाची वाढ रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दरम्यान राज्यातील सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे नेते हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. हा आरोप करताना भाजपने राज्याचे गृहनिर्माण मंत्री (Jitendra Awhad) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पक्षाने ट्विट करत हा निशाणा साधला आहे. राज्यात वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर कडक पावले उचलली जातील असे ठाकरे सरकार एकीकडे म्हणत आहे. मात्र दुसरीकडे याच सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे मोठमोठे कार्यकर्ता मेळावे घेत आहेत, असे भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्याचे मंत्री आणि खासदार असे मेळावे घेत असतील तर मग कडक निर्बंध आणि कारवाया फक्त सर्वसामान्यांसाठीच का?, असा सवाल भाजपने विचारला आहे. या ट्विटमध्ये भाजपने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here