अमरावती: खासदार आणि आमदार यांना करोनासंदर्भातील नियम न पाळणे भोवले आहे. कडक निर्देश असतानाही राणा दाम्पत्याने विनामास्क, विनाहेल्मेट अमरावतीमधील रस्त्यांवरून बुलेटसफर केली होती. हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राणा दाम्पत्याविरोधात टीका होत होती. लोकप्रतिनिधीच असे वागतील तर, त्यांचे कार्यकर्ते बेछुट सुटतील, असा आरोपही होत होता. आता या प्रकरणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या सह १५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

राणा यांनी विनामास्क केलेल्या बुलेट सवारीबाबत मात्र पोलिसांनी कुठलीच कारवाई अद्याप केलेली नाही. त्यामुळे मास्क नसल्याने सामान्यांवर कारवाई करणारे प्रशासन आता राणा दाम्पत्याबाबत काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शुक्रवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्याचे पती आमदार रवी राणा दोघेही बुलेटने शिवजयंतीच्या कार्यक्रमस्थळी गेले होते. सध्या कोरोनामुळे प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र राणा दाम्पत्याने मास्क न लावता दुचाकीने प्रवास केला होता. त्यानंतर त्यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. तेव्हाही त्यांनी मास्क लावलेला नव्हता. कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अखेर या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here