रियाध: वाळवंटासाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियात काही दिवसांपूर्वी जोरदार हिमवृष्टी झाली. सौदीतील या हिमवृष्टीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जवळपास ५० वर्षानंतर अशाप्रकारची हिमवृष्टी झाली असल्याचे म्हटले जाते. या हिमवृष्टीमुळे सौदी अरेबियाच्या काही भागातील तापमान शून्य अंश सेल्सिअसवर पोहचले होते.

याआधीदेखील सौदी अरेबियात अशा प्रकारची हिमवृष्टी झाली होती. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय कमी होते. सौदीत झालेली बर्फवृष्टी ही तुरळक प्रमाणात होते. एक आठवड्यांपूर्वी आखाती देशांमध्ये थंडी सुरू झाली आहे. रात्री वाहणाऱ्या थंड हवेमुळे काही भागातील तापमान शून्य अंशाखाली गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सौदीतील नागरिकांना सकाळी उष्ण आणि रात्री थंड हवामानाला सामोरे जावे लागत आहे.

वाचा:
सौदी अरेबियाच्या हवामान खात्याने येत्या काही दिवसात रात्रीच्या वेळी तापमानाचा पारा आणखी घसरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही भागांमध्ये तापमान आणखी कमी होऊ शकते. अशातच लोकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना थंडीपासून बचाव करण्याची आवश्यकता आहे. सौदी अरेबियाच्या असीर भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे.

सौदी अरेबियातील अनेकांनी या बर्फवृष्टीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बर्फवृष्टी सुरू असताना उंटदेखील हैराण झाले असल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

उत्तर आफ्रिकेतील सहारा वाळवंटातील अल्जेरियामध्येही बर्फवृष्टी झाली. या ठिकाणी वाळंवटी प्रदेशात सफेद चादर अंथरल्याचा भास होत होता. अनेक भागात तापमान उणे तीन अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. सौदी अरेबियातील ताबूक भाग हा हिमवृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात सौदी अरेबियातील नागरिकांसह पर्यटकांचीही या भागात गर्दी होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here