चीनमधील करोना व्हायरसची जगभरात भीती पसरली आहे. चीनबाहेर एकाचा मृत्यू झाल्याने आता खळबळ उडाली आहे. चीनमध्ये मृत्युमुखींची संख्या ३०४ वर पोहोचली आहे. तसेच १४ हजार ३८० लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतात करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. केरळमध्ये करोना विषाणूची लागण झालेला हा दुसरा रुग्ण आहे. याआधी चीनमधून परतलेल्या एका विद्यार्थिनीला करोना विषाणूची लागण झाली होती.
पाहा करोना व्हायरसचे देश-विदेशातील ताजे अपडेट्स….
>> चीनमधील वुहानमध्ये करोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण.
>> चीनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून काहीही प्रयत्न नाही
>> भारताने ३२४ नागरिकांना एअर इंडिया विमानाने मायदेशी परत आणले
>> चीनमध्ये १४ हजार ३८० लोकांना करोना व्हायरसची लागण
>> चीनमध्ये मृत्युमुखींची संख्या ३०४ वर पोहोचली
>> भारतात करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times