मुंबईः हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधत आहेत. राज्यात करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळाले असल्याचे दिसत असताना अचानक पुन्हा करोनाने उचल खाल्ल्याने जनतेसह राज्य सरकारच्याही चिंतेत वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलतात हे पाहुया…

Live अपडेट्स…

>> लॉकडाउन करायचा का हाच आजचा सर्वात मोठा विषय आहे- ठाकरे.

>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मंत्री नितीन राऊत यांची केली प्रशंसा- म्हणाले, ‘राऊत यांनी लग्नाचा सोहळा रद्द केला. राऊत यांनी दाखवलेली जाणीव इतरही दाखवतील.’

>> संसर्गाची साखली तोडायची असेल, तर संपर्क हा टाळायलाच हवा- ठाकरे.

>> मधल्या काळात आपल्यात शिथिलता आली- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

>> आपल्या राज्यात पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, मात्र आपल्या राज्यात दुसरी लाट आली की नाही, ते ८ ते १५ दिवसांमध्ये कळेल- मुख्यमंत्री ठाकरे.

>> मास्क ही आपली ढाल आहे, मास्क वापरला नाही तर हा शत्रू आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही. मास्क घालणे अनिवार्य आहे- मुख्यमंत्री ठाकरे.

>> राज्यात करोना पुन्हा डोकं वर काढतोय- ठाकरे.

>> आणखी दोन-तीन कंपन्या लसनिर्मितीसाठी पुढे येत आहेत. त्यानंतर जनतेलाही लस देणार- मुख्यमंत्री ठाकरे

>> कोविड योद्ध्यांनी बेधडकपणे लस टोचून घ्यावी, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

>> करोनाची लस टोचल्यानंतर कोणतेही घातक साईड इफेक्ट आढळलेले नाहीत- ठाकरे

>> घरात बंद ठेवणे कोणालाही आवडणार नाही- उद्धव ठाकरे

>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद सुरू.

>> या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.

>> मुंबई, पुण्यासह विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांतही करोनाचे नवे रुग्ण वाढू लागले आहेत. या तीन जिल्ह्यांत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुण्यातही सोमवारपासून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदीचा लागू करण्यात आली आहे.

>> यामुळे राज्यातील यंत्रणा सतर्क झाल्याअसून राज्यात अनेक ठिकाणी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येऊ लागली आहे.

>> राज्यात करोनावर नियंत्रण आल्याचे दिसत असताना अचानक पुन्हा नव्या रुग्णांमध्ये वाढ दिसू लागली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here