नवी दिल्लीः भाजप आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांनी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आसाम ( ) या राज्यातील निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा झाली. या राज्यांमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरही ( ) चर्चा केली गेली.

पंतप्रधान मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राज्यांचे प्रभारी आणि सह प्रभारींसह प्रदेशाध्यक्षही बैठकीला उपस्थित होते.

राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी शनिवारी पक्ष संघटनेच्या सरचिटणीसांची बैठक दिल्लीत भाजप मुख्यालयात झाली. यामध्ये जे. पी. नड्डा यांनी निवडणूक होत असलेल्या राज्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून अहवाल घेतला.

शेतकरी आंदोलनावरही झाली चर्चा

दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शेतकरी आंदोलनावरही चर्चा झाली. सरकारच्या तिन्ही नवीन कृषी कायद्यांसबंधी शेतकऱ्यांमध्ये कशी जनजागृती करायची यासाठीचे धोरणही भाजपने आखले आहे.

यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. तसंच विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांसंदर्भात, स्वावलंबी भारत अभियान आणि शेतकरी कायद्यांसंबंधी चर्चा झाली. राज्यनिहाय बैठक आणि आगामी कार्यक्रमांसंबंधी चर्चा आणि घोषणा झाल्या, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिली.

शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीतः रमन सिंह

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरीत आहे. देशातील शेतकरी नवीन कृषी कायद्यांमुळे समाधानी आहेत. या कायद्यांचं विविध राज्यांमध्ये स्वागतही करण्यात आलं आहे. शेतकरी आंदोलन सुरू ठेवण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे षड्यंत्र आहे, भाजपचे उपाध्यक्ष रमन सिंह म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here