राजस्थानमध्ये राहुल गांधी हे स्वत: १२-१३ फेब्रुवारीला सभा घेतल्या होत्या. यानंतर सचिन पायलट यांनी शुक्रवारी जयपूरजवळ विशाल जाहीर सभा घेण्यात आली. पण मुख्यमंत्री गहलोत यांच्या गटातील एकही नेता तिथे उपस्थित नव्हता. या सभेमध्ये पायलटसह १७ नेते उपस्थित होते. गेल्या वर्षी सचिन पायलट यांच्यासोबत बंडाचे निशाण फडकावणारे हे नेते होते.
सचिन पायलट यांच्या सभेनंतर दुसर्याच दिवशी काँग्रेस युनिटने जयपूर शहरात मोठी सभा घेतली. यात पायलट यांचे निकटचे नेते उपस्थित नव्हते. यामुळे पुन्हा दोन्ही गट वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दोन्ही बाजूंकडून जाहीर सभांमध्ये शक्तिप्रदर्शन आणि अधिकाधिक गर्दी जमवण्याचं प्रयत्न सुरू आहे. आपली राजकीय विश्वासार्हता बळकट करण्यासाठी हे एक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
सचिन पायलट यांना यासंबंधी प्रश्न विचारला गेला. हे समांतर राजकारण आहे का? असा प्रश्न त्यांना केला गेला. असं काही नाही आणि हा पक्षाचा कार्यक्रम आहे. सर्वजण शेतकर्यांच्या समर्थनार्थ सभा घेतली असा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासारा यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट घेण्यासाठी ८ दिवसात वेळच दिला गेला नाही, असं सभेचे आयोजक आणि चाकसूचे काँग्रेसचे आमदार वेदप्रकाश सोलंकी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times