फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोनाच्या ताज्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. सुरुवातीच्या काळात आपण नियम पाळत होतो, मात्र मधल्या काळाच आपण ढिलाई दिली. मास्क, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी विसरलो असे सांगत आता काही ठिकाणी निर्बंध आणावे लागतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
तुम्हाला राज्यात लॉकडाउन हवा की नको, असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला विचारला. जर लॉकडाउन नको असेल तर जनतेला काळजी घ्यावीच लागेल, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्रिसूत्रीचे पालन करण्याची कळकळीची विनंती जनतेला केली. ज्यांना लॉकडाउन नको आहे ते मास्क घालून फिरतील, हात धुतील आणि सामाजिक अंतर पाळतील, आणि ज्यांना लॉकडाउन हवा आहे ते मास्क घालणार नाहीत, हात धुणार नाहीत आणि सामाजिक अंतर पाळणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मास्क घालणे हे अनिवार्य असून मास्क घालणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
काही दिवस राज्यातील सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी
येत्या काही दिवस गर्दीचे कार्यक्रम टाळण्याची अत्यंत गरज असून करोनाचा प्रसार रोखता यावा यासाठी उद्यापासून काही दिवसांसाठी राज्यात गर्दी जमवणाऱ्या सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक अशा मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येत आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा-
योद्ध्यांनी बेधडकपणे लस टोचून घ्यावी- मुख्यमंत्री
करोनाची लस टोचून घेतल्याने कोणतेही घातक साइड इफेक्ट होत नाहीत. यामुळे करोना योद्ध्यांनी बेधडकपणे लस टोचून घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोना योद्ध्यांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times