cases and 35 deaths today)
आज राज्यात एकूण ३५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४० इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४७ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के इतके झाले आहे.
तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५७ लाख २० हजार २५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ८८४ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.३६ टक्के इतके आहे. सध्या राज्यात २ लाख ४२ हजार ५६३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ७३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील अॅक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण
राज्यात कालच्या तुलनेत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढून ती आज एकूण ५२ हजार ९५६ इतकी झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती ५ हजार ८५९ इतकी झाली आहे. तर ठाण्यात ही संख्या ५ हजार ९८३ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजार ३२१, नाशिक येथे १,८६४, अहमदनगर येथे १,१३५, औरंगाबाद येथे १,२६४, नागपूर येथे ६ हजार ७९७, कोल्हापूर येथे २२९ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोली आहे. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times