सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या चित्रपट ” जेव्हा रिलीज झाला त्यावेळी रणवीरनं असं काही केलं की ज्यामुळे सलमान त्याच्यावर खूप रागावला होता. हा चित्रपट रिलीज झाला त्यावेळी रणवीर पॅरिसमध्ये होता आणि तो चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला होता. त्यावेळी एका गाण्यावर त्यानं स्क्रिनसमोरच डान्स करायला सुरुवात केली. जेव्हा चित्रपटाच्या एका इव्हेंटमध्ये एका पत्रकारनं रणवीरच्या डान्सवर सलमानला प्रतिक्रिया विचारली तेव्हा सलमान रणवीरवर खूप रागावला आणि त्यानं रागातच प्रतिक्रिया दिली होती.
सलमाननं मीडियासमोरच आपली नाराजी व्यक्त रणवीरला जीवे मारण्याचं वक्तव्य केलं होतं. एवढंच नाही तर मी त्याच्यावर चेअर फेकून मारली असती असंही त्यानं यावेळी म्हटलं होतं. यापुढे सलमान लगेच म्हणाला, ‘प्रेक्षक चित्रपट पाहत आहेत आणि त्यानं अचानक उठून स्क्रिनच्या समोर डान्स केला. ज्यामुळे प्रेक्षक डिस्टर्ब झाले.’ सलमानचं बोलणं एकून अभिनेत्री अनुष्का शर्मा सुद्धा चकीत झाली आणि त्याच्याकडे हैराण होऊन पाहू लागली. पण सलमाननं लगेच हसून वातावरण हलकं केलं.
सलमानचा चाहता आहे आणि त्याला आपल्या आवडत्या कलाकारांचे आणि स्वतःचे चित्रपट थिएटरमध्ये पाहायला आवडतात. पण सलमानला त्याचं असं अचानक प्रेक्षकांमधून उठून डान्स करणं अजिबात आवडलं नव्हतं. सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘राधे’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. तर रणवीरचा बहुचर्चित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times