कलर्स टीव्हीनं बिग बॉस १४ चा नवा प्रोमो शेअर केला आहे ज्यात राखीला सांगताना दिसतो की, तिला भेटण्यासाठी रितेश बिग बॉस हाऊसमध्ये येणार आहे. त्यानंतर रितेश सहरा बांधून बिग बॉसच्या घरात एंट्री करताना दिसतो. पण हा राखी सावंतचा पती रितेश नाही तर अभिनेता रितेश देशमुख आहे. रितेशला पाहून राखी म्हणते मी तर माझ्या पतीला शोधत होते. रितेश बिग बॉसच्या घरात येऊन धम्माल करताना दिसणार आहे.
राखी सावंत बद्दल बोलायचं तर स्पर्धकाच्या संपूर्ण पर्वातील प्रवासाची झलक जेव्हा बिग बॉसनी दाखवली त्यावेळी त्यांनी राखी सावंत या पर्वाची खरी एंटरटेनर असल्याचं म्हटलं होतं. राखीनं घरात खूप मस्ती आणि धम्माल केली. तिचा हाच अंदाज प्रेक्षकांना जास्त भावला होता. त्यामुळे राखी टॉप ५ स्पर्धकांच्या यादीत एंट्री करू शकली आहे.
दरम्यान #BiggBoss14Finale सध्या ट्विटरवर टॉप ट्रेन्डमध्ये आहे. काही वेळातच या पर्वाचा विजेता घोषित होणार आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांचा आवडता स्पर्धक जिंकण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान रुबीना दिलैक या पर्वाची विजेती होऊ शकते अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तर राहुल वैद्यच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे विजेतेपदासाठी राहुल आणि रुबीनामध्ये अटीतटीची लढाई होणार असं मानलं जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times