वाचा-
आयपीएल २०२१ ची सुरुवात एप्रिल मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याआधी संघातील एक मुख्य फलंदाजाने फॉर्म परत मिळवला आहे. संघातील कर्णधार महेंद्र सिंह धोनीनंतरचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू ( )ने एक धमाकेदार खेळी केली आहे. हरियाणा येथे गुरुग्राममध्ये झालेल्या टी-२० सामन्यात रैनाने ४६ चेंडूत नाबाद १०४ धावा ठोकल्या.
वाचा-
वाचा-
वाचा-
निझावान वॉरियर्स आणि टायटंन्स झेडएक्स संघात झालेल्या सामन्यात रैनाने ११ चौकार आणि ७ षटकार मारले. या सामन्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात रैनाच्या संघाला २० षटकात २३० धावांचे लक्ष्य गाठायचे होते. रैनाच्या स्फोटक फलंदाजीने त्यांनी हे लक्ष्य १९.५ षटकात पार केले.
वाचा-
गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत रैना वैयक्तीक कारणामुळे खेळला नव्हता. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो भारतात परतला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times