भुजबळ यांनी यावेळी नियम पाळण्यावर भर दिला. जनतेने नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच मास्क न वापरल्यास लोकांना १ हजार रुपये इतका दंड भरावा लागणार असल्याचे म्हणाले. येत्या आठ दिवसांत करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आली नाही, तर कडक निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनचे निर्णय घेतले जात आहेत. नाशिकसाठी मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लॉकडाउन नागरिकांनाही परवडणारा नाही आणि शासनाला देखील परवडणारा नाही. असे असले तरी जर करोनाचे रुग्ण वाढतच गेले, तर लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असे भुजबळ म्हणाले. लॉकडाउनचा निर्णय पूर्णपणे जनतेच्याच हाती आहे, असेही भुजबळांनी सांगितले.
जर नागरिकांनी मास्कचा वापर केला, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर केला तर करोना आटोक्यात येऊ शकतो. अन्यथा सरकारला लॉकडाउनबाबत पुनर्विचार करावा लागेल, यावर भुजबळ यांनी जोर दिला.
क्लिक करा आणि वाचा-
कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत लस घ्यावी- भुजबळ
जिल्ह्यात सुमारे ६९ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले होते. ६९ हजार कर्मचाऱ्यांपैकी एकूण ४० हजार कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत लस घेतली आहे. शासनाकडे लशींचा साठा असून सर्व कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत लस घ्यावी, अशी आमची त्यांना विनंती असल्याचे भुजबळ म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times