मुंबई: लोकप्रिय टीव्ही शो हिंदी बिग बॉसच्या १४ व्या पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला आहे.गेल्या काही महिन्यांपासून टीव्हीवर हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. आणि या टॉप २ स्पर्धकांमध्ये दोघांमध्ये अतीतटीची स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर रुबीनानं बिग बॉसची ट्रॉफी जिंकली.

या पर्वात अनेक कारणांनी रुबीना सर्वाधिक चर्चेत राहिली. मात्र, त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनातही तिनेने स्थान मिळवलं आणि त्या जोरावरच ”ची ट्रॉफी उंचावली. यासोबतच ३६ लाख रुपयांच्या बक्षिसाचाही धनी ठरली आहे.

‘अब पलटेगा सीन, क्युन्की बिग बॉस डेगा 2020 को जवाब’, अशी या १४ व्या पर्वाची थिम होती. या शोमध्ये अभिनव शुक्ला, एजाज खान, राहुल वैद्य, पवित्र पुनिया, जास्मीन भसीन, निक्की तांबोळी, शहजाद देओल, जान कुमार सानू, रुबीना दिलैक, निशांतसिंग मलकानी आणि सारा गुरपाल हे सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, राखी सावंत यांसह काही सिनिअर्सनी एन्ट्री घेतली होती.

अभिनेता सलमान खानने ‘बिग बॉस १४’ चा विजेता म्हणून च्या नावाची घोषणा करताच एकच जल्लोष झाला. दरम्यान, या महाअंतिम सोहळ्याला अभिनेते धर्मेंद्र यांनी खास हजेरी लावली होती. तर अभिनेता रितेश देशमुखही सहभागी झाला होता. तर नोरा फतेहीचा धमाकेदार डान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

‘बिग बॉस’चा अंतिम सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. बिग बॉसचा होस्ट सलमान खानने या सोहळ्यात रंग भरले. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सोहळ्यात शेवटही तितकाच उत्कंठावर्धक राहिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here