अहमदनगर: नगर-औरंगाबाद महामार्गावर तालुक्यात देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी आराम बसच्या अपघातात पाच जण ठार झाले. हा अपघात आज पहाटे दोनच्या सुमारास झाला. कारमधील मृत जालना जिल्ह्यातील आहेत.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार यातील स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) औरंगाबादहून नगरकडे येत होती. देवगड फाट्याजवळ नगरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसशी (एमएच १९ वाय ७१२३) तिची धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. ते सर्वजण जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती.

या अपघाताची माहिती समजताच नेवाशाचे फौजदार भरत दाते यांनी आपले सहकारी पोलिस कर्मचारी अशोक नागरगोजे, बबन तमनर, दिलीप कुऱ्हाडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तेते स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी आसल्याने सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. पहाटेची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगाने जात असावीत. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here