म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई पालिकेने मास्क न वापरणाऱ्यांप्रमाणेच हॉटेल, , बारसह इतर सार्वजनिक ठिकाणी नियमाचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. वेगवेगळ्या भागातील इमारतींही सील करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात, शनिवारी रात्री वांद्रे पश्चिमेतील १४५ कॅफे आणि पबमध्ये पार्टीसाठी सुमारे २५० जण एकाचवेळी जमले होते. त्याची गंभीर दखल घेत पालिकेकडून वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वाचा:

पालिकेच्या वांद्रे पश्चिमेतील विभाग कार्यालयातील पथक शनिवारी विविध ठिकाणी पाहणी करत होते. चित्रपटगृहे, हॉटेलमध्ये पाहणी करून ‘१४५ कॅफे’ आणि पबमध्ये शनिवारी रात्री ११.३५ वाजता पोहोचले असता तिथे २५० जण जमल्याचे दिसून आले. करोनाचे नियम लागू असतानाही तिथली गर्दी पाहून पालिकेचे पथक चक्रावले. तेव्हा, त्यांनी कॅफेच्या व्यवस्थापकाकडे त्याविषयी चौकशी केली. तेव्हा, तिथे जमलेल्या कोणत्याही ग्राहकास करोना नियमांची जाणीव करून दिली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने ध्वनीक्षेपकाच्या आधारे तातडीने कॅफे बंद करण्याची सूचना देण्यात आली. तर, कॅफेचालकावर ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसेच, कॅफेच्या व्यवस्थापकाविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here