समीरच्या (Sameer Gaikwad) आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, समीरने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सर्वात आधी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड पोहोचला होता. या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर समीरला खाली उतरले आणि नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. गेल्या काही दिवसांपासून तो त्रस्त होता, असे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल हा घरी पोहोचला. त्यावेळी समीर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याने लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. समीरला खाली उतरवून तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे तपासणी करून त्याला मृत घोषित केले. समीर हा टिकटॉक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओमुळे खूप प्रसिद्ध झाला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता. पोलीस सर्व दिशेने तपास करत आहेत. घटनास्थळी सुसाइट नोट सापडलेली नाही. समीरच्या मृत्यूनंतर त्याच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक पोस्ट तरुणाईने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times