‘करोना’ व्हायरसची लक्षणं!
या ‘करोना’ विषाणूची लक्षणं सामान्य असतात. जरी एखादा व्यक्तीला या विषाणूची लागण झाली नसेल. तरीही या व्हायरसशी संबंधित असलेली लक्षणं त्या व्यक्तीत दिसू शकतात. सर्दी, डोकेदुखी, खोकला, पित्त, घसा खराब होणे, ताप, अशक्तपणा, श्र्वसनाचा त्रास, न्यूमोनिया, ब्रॅान्कायटीस यांसारखे गंभीर आजार होणं ही करोनाची लक्षणं आहेत.
संसर्ग पसरणार नाही यासाठी उपाय!
आहारतज्ज्ञ डॉ. शरद कसारले यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.तसंच करोनामुळं आजार होऊ नये, यासाठी खबरदारी सुद्धा घ्यायला सांगितली आहे. या विषाणूचा संसर्ग माणसां-माणसांतून होतो का? याबाबतची अधिकृत माहिती सध्या गुलदसत्यातच आहे. मात्र, तरीही या व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी सावध राहणं गरजेच आहे.
कंठात सतत ओलावा ठेवणे!
तुमचा घसा आणि कंठ सतत ओला ठेवा. जास्तीत जास्त पाणी पीत राहा. जर तुम्ही तहानलेले असाल आणि वेळेवर पाणी पिण्याचा कंटाळा केला, तर तुमचा घसा कोरडा होईल आणि कोरड्या घशातच ‘करोना’ प्रवेश करतो. त्यामुळं जेवढ शक्य होईल तितकं पाणी पित राहा.
उकळलेलं गरम पाणी पिणं!
साध्या पाण्याएवजी उकळलेलं गरम पाणी पित राहा. पाण्याचे मोठ मोठे घोट घेऊ नका. जसं चहा प्यायला जातो, तसंच एक एक घोट घेत गरम पाणी प्या.
मांसाहार खाणं टाळा!
‘करोना’ हा जीवघेणा व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळं काही दिवसांसाठी मांसाहार करू नका. जोपर्यंत या व्हायरसचा संसर्ग कमी होत नाही, तोपर्यंत नॅानव्हेज खाणं टाळा.
व्हिटॅमिन ‘सी’ चे करा सेवन!
तुमच्या रोजच्या नियमित आहारात संत्रे, स्ट्रॅाबेरी, कोबी यांसारख्या फळभाज्यांचा समावेश करा. कारण या फळभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. व्हिटॅमिन ‘सी’ चे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारकशक्ती अधिक वाढण्यास मदत होते.
बी कॅाम्प्लेक्स टॅबलेट
व्हिटॅमिन ‘सी’ बरोबरच झिंक आणि ‘बी’ कॅाम्प्लेक्सच्या टॅबलेटही तुम्ही तुमच्या डायटसोबत घ्या. या टॅबलेटनेही तुमची रोगप्रतीकारकशक्ती वाढते आणि तुम्हाला आजार होण्यापासून वाचवते.
तुळसी आणि हळदीचा काढा
गरम पाण्यात तुळस,आले, काळी मिरी आणि हळद टाकून त्याचा काढा तयार करा. या काढ्याचे दररोज सेवन करा. अशा प्रकारच्या आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांमुळे ‘करोना’ विषाणू आणि बॅक्टेरियापासून दूर राहू शकता. फ्राय, तेळकट पदार्थ खाणे टाळा. सकस आहार घ्या. गरमागरम व्हेज सुप प्या. त्यामुळं तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल आणि तुम्हाला निरोगी राहता येईल.
सार्वजनिक ठिकाणी जाणं शक्यतो टाळा
‘करोना’ व्हायरस अनेक देशांमध्ये वेगाने पसरला आहे. त्यामुळं गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका. बाहेरुन आल्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा. माखलेल्या हाताने चेहरा, नाक, डोळे आणि तोंडाला स्पर्श करू नका.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times