पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात सध्या देशात संतापाचे वातावरण आहे. केंद्र सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी यूपीए सरकारच्या काळात इंधनाच्या दरवाढीवर बोलणाऱ्या सेलिब्रिटींना लक्ष्य केलं आहे. या सगळ्या घडामोडींवर युवासेनेनं पोस्टरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. युवासेनेकडून वांद्रे पश्चिम मतदारसंघात बॅनरबाजी करण्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधील पेट्रोल पंपांवर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमध्ये यही हे अच्छे दिन?, असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
वाचाः
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. यात यही है अच्छे दिन? असा सवाल करत मोदी सरकारच्या दोन टर्मची तुलना करण्यात आली आहे. सन २०१५ मधील गॅस, पेट्रोल डिझेलच्या किंमती तर, सन २०२१मधील किंमती यातील फरक पोस्टरमध्ये लिहला आहे. दरम्यान, वांद्रे पश्चिम मतदारसंघ हा भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा आहे. वांद्रे पश्चिमबरोबरच खार, सांताक्रुझ परिसरातील चौकातही मोदी सरकारवर टीका करणारे पोस्टर लावण्यात आले आहे.
वाचाः
दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पेट्रोल ९७ रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.०६ रुपये आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८०.९७ रुपये झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times