मुंबई: राज्यात करोनाच्या आजारानं पुन्हा एकदा उचल खाल्ली असून प्रशासन कामाला लागलं आहे. संसर्ग आटोक्यात राहावा म्हणून मुख्यमंत्री यांनी राज्यात सर्व सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तर, जनतेलाही दक्ष राहण्याचं आवाहन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी आपले सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. ( Cancelles All His Public Programmes)

वाचा:

पवार यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच, माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शरद पवार हे सातत्याने लोकांमध्ये फिरणारे नेते आहेत. करोनाच्या काळातही अनेकदा फिल्डवर जाऊन त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली होती. प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. निसर्ग चक्रीवादळ असो किंवा अन्य प्रश्नांच्या निमित्तानं पवार हे राज्यभर फिरत होते. संसद अधिवेशनाच्या निमित्तानं ते काही दिवस दिल्लीतही होते. करोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम वाढले होते. अनेक सभा-समारंभांनाही ते हजेरी लावत होते. मात्र, राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं दिसत आहे. दिवसाला सहा ते सात हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. गर्दी होईल अशी कुठलीही कृती राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

वाचा:

शरद पवार हे रविवारी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला हजर होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरही नेते व पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. त्यापैकी भुजबळ यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here